बारामती रेणुका नगर येथे निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बारामती शहरातील रेणुका नगर मधील नागरिकांनी ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठी बारामती नगर परिषद समोर आंदोलनाचा इशारा दिला होता. सदर आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बारामती नगर परिषद प्रशासनाने काम चालू केले आहे. नगरपरिषदेचे आरोग्य विभाग अधिकारी अजय लालबिगे यांनी स्वतः थांबून सदर काम सुरू केले आहे.
सदर ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे.काम करताना वापरलेली सिमेंट, वीट, खडी तशीच ड्रेनेज मध्ये पडलेली असल्यामुळे ड्रेनेज ब्लॉक झाले आहेत.सदर ड्रेनेजला प्लास्टर करणे गरजेचे होते परंतु प्लास्टर केलेले नाही.
जेव्हा ड्रेनेजचे काम चालू होते त्यावेळेस सदर कामाची पाहणी ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.तसेच ज्या ठेकेदाराने काम घेतले त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे त्याला काळया यादीमध्ये टाकण्याची मागणी करणार असल्याचे योगेश महाडिक संस्थापक अध्यक्ष भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती फलटण रोड कसबा यांनी सांगितले..
निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. मलिदा वेळेवर पोहोचत असल्यामुळे अधिकारी या कामांकडे लक्ष देत नाहीत असे दिसत आहे.असे गौरव अहिवळे यांनी मत व्यक्त केले.