बारामती तालुक्यात संविधान भवन उभे करा – रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची मागणी
बारामती- तालुक्यातील करंजे,सोमेश्वरनगर, पारवडी, मोरगांव,उंडवडी सुपे, सांगवी, सोनगांव याठिकाणी संविधान भवन उभे करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) पक्षाचे वतीने पंचायतसमिती गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल यांना निवेदन देण्यात आले.बारामती तालुक्यातील करंजे,सोमेश्वरनगर, पारवडी, मोरगांव,उंडवडी सुपे, सांगवी, सोनगांव याठिकाणी संविधान भवन उभे करणेबाबत महाराष्ट्र शासनाचा जी. आर. तसेच निधी देखील उपलब्ध असतानाअद्यापपर्यंत उचीत कार्यवाही झाली नाही. तसेच दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत आलेला निधी देखील परत जात आहे. असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तरी बारामती तालुक्यातील करंजे, सोमेश्वरनगर, पारवडी, मोरगांव, उंडवडीसुपे, सांगवी, सोनगांव या ठिकाणी संविधान भवन उभे करणे त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पक्षातर्फे वतीने तीव्रआंदोलन छेडण्यात येईल, व होणारे परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील यांची गंभीर दखल घ्यावी असा इशारा बीडीओ यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील शिंदे, तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, युवक शहराध्यक्षमयूर मोरे, महिला आघाडी अध्यक्ष पुनमताई घाडगे, रिपब्लिकन पक्ष मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद खंडाळे,मातंग आघाडी महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई घोरपडे, सह आशोक साळवे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी यावेळीउपस्थित होते.