Uncategorized
निवडणुकीत शेवटच्या क्षणाला ७६ लाख मतदानाचा मुद्दा, प्रकाश आंबेडकर स्वत: युक्तिवादाला कोर्टात उभे
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन चंद्रकांत अहिरे यांची ही रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. भारतीय संघ, भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या याचिकेतील प्रतिवादी आहेत.
निवडणुकीत शेवटच्या क्षणाला आणि मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतरही मतदानाच्या प्रमाणापेक्षा वाढलेल्या टक्केवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिवाय, अधिकृत वेळ संपल्यानंतर उपस्थित असलेल्या मतदारांना वाटण्यात आलेले पूर्व-क्रमांकित टोकन उघड न करणे, निवडणूक आयोग त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या विसंगतींबद्दल तपशीलवार डेटा जाहीर करण्यात अपयशी ठरणे आणि त्यांच्याकडे संबंधित डेटा नसल्याची लेखी प्रतिज्ञा देणे गंभीर आहे.