Uncategorized
तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भरसभेत पुन्हा जीभ घसरली
मा.उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच वादग्रस्त बोलतात, परंतु मधल्या काळामध्ये ही वादग्रस्त वाक्ये कमी झाली होती. आज बोलता बोलता अजित पवारांनी पुन्हा मतदारांना असाच एक प्रश्न विचारला. अजित पवार मेडदमधील भाषणात बोलत असतानाच काही लोक निवेदन देत होते. भाषण सुरू असतानाच अजित पवार निवेदनं वाचत अधिकाऱ्यांना बोलावून ही कामे हात वेगळी करत होते आणि अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घाला अशी सूचना करत होते.याच दरम्यान एका कार्यकर्त्याने बरीच महिने झाले हे काम झाले नाही असा धोशा लावला. त्यानंतर दुसऱ्याही कार्यकर्त्याने त्याच्या सुरात सूर मिसळला. हे पाहून काहीसं चिडलेल्या अजित पवार यांनी चेहऱ्यावर तसा आव न आणता एक वाक्य वापरले ते म्हणजे ‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात’ असे अजित पवार म्हणाले आणि पुन्हा शांतता पसरली.