इंदापूर शहरात प्राथमिक शाळेत अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका अध्यक्ष किर्तिकुमार वाघमारे यांचा आंदोलनाचा इशारा
इंदापूर :- इंदापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ मुलांची व २ मुलींची इंदापूर नगरपालिका शेजारी असून त्या शाळेतील अस्वच्छता आणि बाथरूमची दुरावस्था याकडे प्रशासकीय अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष आहे.प्राथमिक शाळेच्या काही अंतरावरच इंदापूर नगरपालिका असून प्रशासकीय अधिकारी यांचे प्राथमिक शाळेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्राथमिक शाळेमध्ये इंदापूर शहरातील बहुजन समाजातील लहान मुले शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि त्या लहान मुलांना त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आहे अस चित्र पाहायला मिळत आहे. तरी इंदापूर नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी यांनी जर दोन दिवसांमध्ये पिण्याचे पाण्याची सोय व टॉयलेट-बाथरूम स्वच्छता करून न दिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल अशा इशारावंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका अध्यक्ष किर्तिकुमार वाघमारे यांनी दिला आहे.