Uncategorized

बारामती पोलिसांनी दोघांना केलं एक वर्षासाठी हद्दपार.. पुणे जिल्ह्यासह फलटण तालुक्यात दिसल्यास कारवाई होणार!

बारामती शहर पोलिसांनी आमराई परिसरातील धीरज रवींद्र पडकर व तुषार उर्फ चिंट्या मारुती सोनवणे (दोघेही रा. एसटी स्थानकासमोर आमराई बारामती) या दोघांना पुणे जिल्ह्याच्या पुणे जिल्हा, शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासह फलटण तालुक्याच्या हद्दीतून एक वर्षाकरिता तडीपार केले आहे.

 

या संदर्भातील माहिती पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली. या दोघांवर दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गर्दी मारामारीसह दुखापत यासारखे गुन्हे असून धीरज रवींद्र पडकर याने स्वतःची टोळी तयार केली असून तो या टोळीच्या माध्यमातून वरील कृत्ये बारामती शहर व तालुक्याच्या परिसरात करीत आहे. या कृत्याला त्यांनी व्यावसायिक स्वरूप दिल्यामुळे बरीच बेरोजगार तरुण मुले कष्टाविना मिळणाऱ्या पैशामुळे या वाईट प्रवृत्तीकडे आकर्षित होताना दिसत आहेत. यातून सामान्य लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कृत्याला आळा बसावा यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

 

पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, फौजदार सतीश राऊत, सागर जामदार, अक्षय सिताप, अमीर शेख, दत्तात्रय मदने, अमोल देवकाते, महेश बनकर, रामदास बाबर यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button