वृक्षप्रेमी दादाच्या बारामतीत वृक्षाधिकारी यांच्या आशीर्वादाने अमाप वृक्षतोड ? कुंपणच शेत खायला लागलय दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा
गेल्या अनेक वर्षापासून बारामती मध्ये विकासकामे चालू आहेत. बारामती म्हटलं की दादाची बारामती म्हणून बारामतीची प्रचिती आहे. आणि दादांची बारामतीत वृक्षप्रेमी म्हणून ओळख आहे. वाढत्या शहरीकरनामुळे बारामतीत अनेक ठिकाणी वृक्षतोड चालू आहे. याचाच फायदा घेत उद्यान विभागातील कर्मचारी दादांच्या नावाचा फायदा घेत आर्थिक लागेबांधे करून आपल्या जवळच्या लाकूड तोड्याला वृक्षतोड करण्यास सांगून नफा मिळवत आहेत. त्यासाठी ते खाजगी लाकूड तोड्याला नगर पालिका उद्यान विभागात असणारे ट्रॅक्टर,मालवाहतूक गाडी, क्रेन व कंत्राटी कामगार सुध्दा वापरण्यास देत आहेत. काहीवेळा नगर पालिकेचे कंत्राटी कर्मचारी अर्जावर कारवाई करून तोडलेली लाकडे जळाऊ लाकडाच्या बखारीत विकत आहेत. त्याबद्दल कुणी जाब विचारला तर अरेरावीची भाषा करत उध्टपणे उत्तर देतात व हे दादांनी सांगितलेले काम आहे तुला काय करायचे आहे ते कर असे म्हणतात. अशा उध्टपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा होत नाही म्हणून कुंपणच शेत खायला लागलय किंवा वृक्षप्रेमी दादाच्या बारामतीत वृक्षाधिकारी यांच्या आशीर्वादाने अमाप वृक्षतोड चालू आहे का? अशी दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे.