विजयादशमी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौध्द अनुयायांच्या वाहनांना टोल माफ करा -वंचित बहुजन युवा आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे विजयादशमी दिवशी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणून साजरा केला जातो.त्यामुळे हा दिवस जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी सन्मानाचा मुक्तीचा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी, नागपूर ,बौद्ध लेणी, औरंगाबाद ,अकोला आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी हा सण साजरा करतात. यावर्षी देखील 12 ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान प्रवास करतील. एवढ्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सण असताना देशाच्या विविध भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसूल केला जातो. महाराष्ट्र आणि देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत असतात. त्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका कार्यकारिणी सदस्य यांच्याकडून धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त चार चाकी वाहनांनी प्रवास करणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी आकारण्यात येणारा टोल माफ करावा याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे पत्र इंदापूर सरडेवाडी टोलनाक्यावर टोलनाका मॅनेजर नितीन शिंदे यांना पत्र दिले. त्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका अध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे महासचिव सोमनाथ खानेवाले सदस्य अमीर सय्यद इंदापूर शहर महासचिव तेजस सरतापे उपस्थित होते.