वंचित बहुजन युवा आघाडीचे इंदापूर तालुकाध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश, अवैद्य धंद्यांवर तातडीने कारवाई ला सुरवात
प्रतिनिधी- मागील काही दिवसात इंदापूर तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे राजरोसपणे रात्र आणि दिवस जोमाने चालू होते यामुळे अनेक कष्टकरी कुटुंब उध्वस्त होत चालली होती. तसेच अनेक शाळकरी विद्यार्थी देखील व्यसनाधीन होऊ लागली होते यावर कोणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. दारू मध्ये उध्वस्त झालेले कुटुंबीय वारंवार पोलीस स्टेशनला धडका घेत होते तरी देखील त्यांना उडवाउडवीची उत्तर देत ह्या धंद्यांना पाठबळ देण्याचे काम चालू होते.यावर उपाययोजना व्हावी यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका कार्यकारिणीने यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत या धंद्यांवर कारवाई होण्याकरता पुढाकार घेतला व 29 सप्टेंबर रोजी इंदापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन तसेच वालचंद नगर पोलीस स्टेशन भिगवण पोलीस स्टेशन व बावडा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडी तालुकाध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने केली. या मागणीची दखल घेत इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक यांच्या मार्गर्शनाखाली कारवाईला सुरुवात करत अनेक अवैध गुटका धंद्यावर छापा टाकत व्यवसायिकांवर कारवाई केली व इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच अवैद्य गुटका व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करून घेतले. यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे, उपाध्यक्ष उमेश मोरे व गणेश जाधव, तालुका महासचिव सोमनाथ खानेवाले व तालुका संघटक समीर सय्यद यांनी निवेदन सादर केले होते. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष कीर्तीकुमार वाघमारे यांनी सांगितले की जरी अवैद्य धंद्यांवरती कारवाई सुरू झाली असली तरी जोपर्यंत हे अवैध धंदे पूर्णपणे बंद होत नाहीत तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहे व वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका कार्यकारणीचे सर्व सदस्य इंदापूर तालुका अवैध धंदे मुक्त करणार आहे अशी माहिती दिली.
वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका अध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे