Uncategorized

बारामतीत होणार तिरंगी लढत वंचित बहुजन आघाडीकडून मा. मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी जाहीर

बारामती: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने सोमवारी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली आहे. या घोषणेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वंचित बहुजन युवा पुणे जिल्हा पूर्व जिल्हा अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांची सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात ब्ल्यू पँथर सामाजिक संघटना स्थापनेपासून झाली.त्यांनी अनेक गोरगरीब लोकांची तसेच तरुणांची कामे करुन दिली व सामाजिक चळवळीत महत्त्वाचे स्थान निर्माण केले. निकाळजे हे वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यापासून पक्षात एक निष्ठेने काम करत आहेत. वंचित बहुजन आघाडी होण्याआधी ते भारिप बहुजन महासंघामध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच वंचितबहुजन आघाडी स्थापनेनंतर त्यांनी मा. जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांच्या कार्यकारणी मध्ये जिल्हा महासचिव पदी कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष राज यशवंत कुमार यांच्या कार्यकारणी मध्ये महासचिव पदी चांगली कामगिरीकेली आहे. त्यांची कामगिरी पाहून पक्षाने त्यांना वंचित बहुजन युवा पुणे जिल्हा पूर्व जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यावर त्यांनी पूर्ण जिल्हा बांधणी करून मिळाल्या भागातील तालुक्यात तालुका, शहर संघटन बांधणी तसेच शाखा बांधणी केली.त्याचप्रमाणे चळवळीचा वारसा जपत राजकीय पदावर कार्यरत नसताना देखील त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत. पक्षात पदावर काम करत असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी आंदोलने, उपोषणे करत गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. तसेच अनेक युवकांना चळवळी बाबत योग्य मार्गदर्शन करत त्यांना आपल्या पक्षाचे ध्येय धोरण पटवून देत पक्ष वाढीसाठी ही प्रयत्न करत आहेत. त्यांची पक्षाप्रती निष्ठा व पक्षवाढी साठीचे प्रयत्न पाहता पक्ष श्रेष्ठी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी मंगलदास निकाळजे यांना बारामती विधान सभा मतदार संघातून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button