वंचित बहुजन युवा आघाडीची इंदापूर शहरातून भव्य बाईक रॅली
इंदापूर :- वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका व शहर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता व त्याच अनुषंगाने वंचित बहुजन युवा आघाडीकडून इंदापूर शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात इंदापूर शहरात बाईक रॅली काढून करत आली. या बाईक रॅलीमध्ये इंदापूर तालुक्यातील अनेक युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.बाईक रॅलीची सुरुवात इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहापासून झाली.शहरांमधील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत संपूर्ण शहरामध्ये फेरी मारण्यात आली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, तथागत गौतम बुद्ध, अहिल्यादेवी होळकर इत्यादी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर इंदापूर शहर शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका व शहर पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. ऋषिकेश भाऊ नांगरे पाटील (वंचितबहुजन युवा आघाडी राज्य सदस्य तथा पुणेजिल्हा निरीक्षक) व मा. विशाल भाऊगवळी (वंचित बहुजन युवा आघाडी राज्य सदस्य) व मा. मंगलदास भाऊ निकाळजे (जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व) हे लाभले होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा. प्रतीक चव्हाण (जिल्हा महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व ) मा. गणेश थोरात (उपाध्यक्ष पुणे जिल्हा पूर्व )मा.कृष्णा साळुंखे (सहसचिव पुणे जिल्हापूर्व), मा. विनय दामोदर (वंचित बहुजनआघाडी बारामती शहर सचिव ) इत्यादी उपस्थित होते.