सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन
पुणे :- राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचा केलेल्या वक्यव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ॲडअसिम सरोदे यांनी निर्भय बनो या उपक्रमाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन महाराष्ट्रातील मतदारांना केले होते त्यामुळे ॲड असिम सरोदे यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा किंवा आरक्षण वाद्यांची माफी मागावी याकरिता त्यांच्या पुण्यातील डेक्कन येथील कार्यालया समोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहराध्यक्ष चैतन्य इंगळे,शहर महासचिव जान्हवी शेलार, वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर महासचिव शुभम चव्हाण, वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नितीन गवळी, पिंपरी चिंचवड शहर महासचिव सुनील जावळे, पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मंगलदास निकाळजे, पुणे जिल्हा पूर्व महासचिव प्रतीक चव्हाण, पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष अभिषेक वैराट, वंचित बहुजनआघाडी पुणे शहराध्यक्ष ऍडव्होकेट अरविंद तायडे, शहर महासचिव सागर अल्हाट, वंचित विश्वास गदादे, बहुजन महिला आघाडी पुणे शहर अध्यक्ष अनिताताई चव्हाण, शहर महासचिव सारिका फडतरे,रेखा चौरे, वंचित बहुजनमहिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सीमाताई भालेसेन, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहर अध्यक्ष विशाल कसबे, शहर सरचिटणीस ओंकार कांबळे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल इनकर. वंचित बहुजन युवा आघाडी दौंड तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, मावळ तालुकाध्यक्ष संदीप कदम,लोणावळा शहराध्यक्ष करण भालेराव,हडपसर विधानसभा मतदारसंघाध्यक्ष लखन कांबळे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन युवाआघाडी, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहर / पिंपरी चिंचवडशहर / जिल्हा माझी माजी पदाधिकारी व कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.