बारामतीमधील 15 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलींवर हडफसर मध्ये सामुयीक अत्याचार! मित्रांनीच दारू पाजून केला अत्याचार
पुणे : घरी काहीही न सांगता बारामतीहून पुण्यात आलेल्या दोघा अल्पवयीन मुलींवर चौघा जणांनी हडपसर येथील एका खोलीत दारू पाजून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी बारामती पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०,रा. बयाजीनगर, रुई, बारामती), यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे(वय २१, रा. सावळ, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथील १५वर्षाच्या दोन अल्पवयीन मुली १४ सप्टेबर रोजी घरी काहीही न सांगता पुण्यात आल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या दोन तक्रारी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.या दोन्ही शहरातील वेगवेगळया शाळेत शिक्षण घेत आहेत. त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. पुण्यात एसटीने येताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने या दोघींना हडपसर येथील एका खोलीवर बोलावले. त्याने आपल्या दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुलींपाठोपाठ तो आणखी एका मित्राला घेऊन बारामतीवरुन हडपसरला आला. तेथे एका मित्राच्या खोलीवर त्याने या मुलींना नेले. रात्री त्यांनी या दोघींना दारु पाजली.त्यानंतर चौघांनी त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर त्या मुली हडपसरला बस स्टॉपवर आल्या. तेथील एका प्रवाशाच्या मोबाईल वरुन एकीने आपल्या आईला फोन केला. बारामती तालुका पोलिसांना आईने मुली हडपसरला असल्याची माहिती दिली. त्यांनी हडपसर पोलिसांना ही माहिती देऊन मुलींना ताब्यात घेतले.बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी दोघींना बारामती पोलीस ठाण्यात आणले. त्यांना महिला पोलिसांनी समुपदेशन केले. यावेळी या मुलींनी आपल्याला दारु पाजून आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर आटोळे याला अटक केली. त्याच्याकडून इतरांची नावे निष्पन्न झाल्यावर आणखी दोघांना अटक केली. चौथ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ॲट्रॉसिटी, लैगिक शोषण तर दुसरा लैगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.