पुण्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या उपनिरीक्षकारावरच केला कोयत्याने वार
पुण्यात कोयता टोळीने सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केला आहे. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता टोळीने हल्ला केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. रत्नदीप गायकवाड यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडाचे नाव निहाल सिंग असे आहे.पुणे पोलिसांवरच गुंड हल्ला करू लागले तर नागरिकही तक्रार करायला घाबरतील. पुण्यासारख्या शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर असा जीवघेणा हल्ला झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कमी पडत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोयता गँगवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कोयता विकताना दुकानदारांना ग्राहकांकडून आधार कार्ड घेणं सक्तीचे केले आहे. मात्र तरीसुद्धा कोयता गँगवर पोलिसांना आपला वचक ठेवता येत नसल्याचं दिसत आहे. पोलिसावर हल्ला करण्याची हिंमत गुन्हेगारांमध्ये येते म्हणजे पोलिसांचा धाक त्यांना राहिलेला नाही हे यावरून सिद्ध होतं. आता पुणे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.