Uncategorized

एससी, एसटी क्रिमिलेअर व वर्गिकरणाच्या बाबतीत दिलेल्या निकालाच्या विरोधात बारामतीत कडकडीत बंद

बारामती : सर्वोच्च न्यायालयाने एससी,एसटी समाजाच्या

आरक्षणाला क्रिमिलेअर लावण्याचा व त्याचे वर्गीकरण

करण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकारला देत असल्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एससी, एसटी समाजात फूट पडणारा व त्यांची एकता तोडणारा असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात बुधवारी (दि. २१) देशभरातीलएससी, एसटी समाजाने ‘भारतबंद’ची हाक दिली. या पार्श्वभूमीवर बारामतीत देखील या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शहरातील सिद्धार्थनगर येथून निषेध मोर्चा देखील काढण्यातआला. पुढे या निषेध मोर्चाचे रूपांतर बारामती नगरपरिषदेसमोर निषेधसभेत झाले. यावेळी विविध पक्ष संघटनांसह हजारो समाज बांधवआणि माता-भगिनी या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.

      सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही.सर्वोच्च न्यायालयाने जरी परवानगीदिली असली तरी आम्ही एससीआणि एसटी समाजाला क्रिमिलेअर लावणार नाही. त्यांचे वर्गीकरण करणार नाही, अशी ग्वाही केंद्र व राज्य सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, निषेध सभेमध्ये कैलास चव्हाण, काळुराम चौधरी, नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, गौतम शिंदे, शुभम अहिवळे, अनिकेत मोहिते, मंगलदास निकाळजे,सीताराम कांबळे, धीरज लालबिगे, अक्षय माने, अशोक इंगुले, श्री गालिंदे, पार्थ गालिदे, अक्षयगायकवाड, सचिन साबळे, आरतीशेंडगे, अस्मिता शिंदे आदींनी यानिर्णयाचा निषेध व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button