बारामती शहरात चार चाकी वाहने चोरणारी टोळी सक्रिय

दि. ३० – बारामती शहरातील अवधूत नगर टीसी कॉलेज
येथे.एका कपडे दुकानदाराच्या राहत्या घरापासून त्यांच्या मालकीची ह्युंदाई क्रेटा. कार किंमत रुपये.१२ लाख ५० हजार. ही चार चाकी गाडी पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरीला गेल्याची घटना घडलेली आहे. बारामती शहरांमध्ये घरफोडी करून चोऱ्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असतानाच आता.
चार चाकी वाहने देखील चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे बारामती शहरांमध्ये चार चाकी वाहने रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या मालकांनी वाहने सुरक्षित पणे आपल्या गेटच्या आत लावावीत अन्यथा आपल्याला देखील याचा फटका बसू शकतो. बारामती शहरांमध्ये एका मोठ्या कपड्या व्यवसायिकाला चार चाकी वाहन चोरीला गेल्यामुळे.खूप मोठा धक्काच बसला आहे. या घटनेमुळे. नागरिकांमध्ये अतिशय चिंतेची वातावरण निर्माण झाले असून चार चाकी वाहन मालकांनी आपल्या गाडीची अतिशय सावधान पणे काळजी घेण्याची गरज आहे घटनेचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर हे करीत आहे